kinwat today news

गोकुंदा ग्राम पंचायत येथे २७ रोजी ग्राम स्वच्छता अभियान

किनवट टुडे न्युज(28): तालुक्यातील गोकुंदा ग्राम पंचायत मध्ये काल दि २७ रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तहसिलदार उत्तम कागणे यांच्या हस्ते ग्राम पंचायत अभियानाचे उद्दघाटन करण्यात आले .
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने मानवी जिवनात स्वच्छतेचे महत्व वाढले आहे तर समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला स्वच्छेते महत्व कळले आहे कारण सार्वजनिक ठीकाणी जर अस्वच्छता असेल तर त्या बाबीची स्विकार्यता कमी होत आहे म्हणजे ज्याठीकाणी अस्वच्छता आहे त्या ठीकाणा पासुन नागरीक दुरावत आहे कारण कोरोना विषाणु हा संसर्गजन्य आजार असुन तो किंवा त्याच्याशी निगडीत इतर कोणतेही आजार जसे ताप येणे, सर्दी होणे, टायफाईड हे पावसाळ्यातील आजार पावसाळ्यातील अस्वच्छ वातावरणामुळे होत असतात परंतु कोणताही आजार झाल्यास कोरोना विषाणुचा संशय बळावुन त्या व्यक्ती पासुन समाजातील नागरीक दुरावत असल्याने नागरीक आता स्वतः चे आरोग्य उत्तम ठेवण्याकडे भर देत आहे याच अणुषंगाने राज्यात ग्राम स्वच्छता अभियानाची सुरवात करण्यात आली.
तर तालुक्यातील गोकुंदा ग्राम पंचायत मध्ये काल दि २७ रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तहसिलदार उत्तम कागणे यांच्या हस्ते ग्राम पंचायत अभियानाचे उद्दघाटन करण्यात आले तर गोकुंदा येथिल मुख्य रस्ता, सा.बा.विश्रामगृह, नांदेड रोड या परिसरासह गोकुंदा शहरातील विविध भागात हे अभियान उत्कृष्ठपणे राबविण्यात आले.यावेळी ग्रामसेवक अशोक चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक पवार, उपसरपंच शे.सलिम शे.मदार, ग्रा.सदस्य उमेश पिल्लेवार, पांडुरंग राठोड, यांच्यासह शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरीक उस्फुर्तपणे या अभियानात सहभागी झाले होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply