kinwat today news

कोरोना टाळेबंदी नंतर शाळा /शिक्षण, काही वर्ग सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणे अत्यावश्यक -शिरीष आळंदे

किनवट (तालुका प्रतिनिधी ) : कोरोना (कोव्हिड-१९ ) च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षात शासन निर्णयाद्वारे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार टाळेबंदी नंतर शाळा /शिक्षण टप्प्या -टप्प्याने सुरू करणे, एक जुलैपासून काही वर्ग सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करणे अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन संपर्क अधिकारी शिरीष आळंदे यांनी केले.
येथील गट साधन केंद्रात शनिवारी (दि. २७ ) आयोजित केलेल्या आढावा बैठकीत या वर्षी शाळा सुरू करण्याबाबतच्या १५ जून शासन निर्णयानुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, सुदर्शन मेश्राम, सूर्यकांत बाच्छे, संजय कराड, ना.ना. पांचाळ, रविंद्र जाधव व शिवाजी खुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्री आळंदे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या वतीने आज जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. आढावा हा शिक्षेसाठी नसून प्रगतीसाठी आहे. यातून कामाला दिशा मिळते. सध्याच्या परिस्थितीवर मात करून जगण्यासाठी संधी द्यावी. केंद्र प्रमुखांकडे केंद्राचं नियोजन असावं. शासन निर्णयातील प्रत्येक मुद्दा सर्व नागरिक व पालकांपर्यंत पोहिचविणे आवश्यक आहे. ऑनलाईन, ऑफलाईन जसं शक्य आहे तसं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे.
आढावा बैठकीतील माहिती : शालेय व्यवस्थापन समित्यांची बैठक घेतलेल्या शाळा ३३५, उपस्थित शिक्षक संख्या १७३७, ऑनलाईन शिक्षण सुरू होऊ शकणाऱ्या शाळा २७१, पूर्वतयारीत स्वच्छ व निर्जंतुकीकरन केलेल्या शाळा ३२९, सरपंच / ग्रामसेवक यांना शासन परिपत्रक वाचून दाखविलेल्या शाळा ३४७, रेड /कन्टेन्मेंट झोनमधील शाळा o, वेळापत्रकानुसार सुरू करता येणाऱ्या शाळा : पूर्णवेळ १७६, अर्धवेळ ९८, एक दिवसाआड ७३, शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या ४३३७१, आधार लिंक झालेली विद्यार्थी संख्या २४९०४, यू डायस अद्यावत केलेल्या शाळा ३७०, पाठ्यपुस्तक वाटप केलेल्या शाळा ३४७ .टी.व्ही. सुविधा असलेले विद्यार्थी २५६४७, स्मार्टफोन असलेले विद्यार्थी १४७०७, रेडिओ असलेले विद्यार्थी ३४९६, कोणतीही सुविधा नसलेले विद्यार्थी ११४०५ , पाठ्यपुस्तक प्राप्त विद्यार्थी २७५७७, शिक्षकांनी तयार केलेले व्हाट्स ऍप ग्रुप १२६६, त्यामधील विद्यार्थी संख्या १४३३२ तालुक्यातील या माहितीचा त्यांनी आढावा घेतला.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, विषयतज्ज्ञ संजय कांबळे, बाबूराव इब्बितदार, एस.एन. ब्राह्मण, डी.बी. मोगरकर, संजय बोलेनवार, आर.एम. कंतूलवार, कनिष्ठ सहायक गिरीधर नैताम, बाळू कवडे आदिंनी परिश्रम घेतले. मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर याचे पुरेपुर पालन करून बैठक घेण्यात आली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply