kinwat today news

भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनच्या वतीने दिनांक 26जून रोजी महाराष्ट्रात आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठीक-ठिकाणी आरक्षण बचाव ऑनलाइन आंदोलन

किनवट प्रतिनिधी – भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनच्या वतीने दिनांक 26/6/2020 रोजी महाराष्ट्रात आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण बचाव ऑनलाइन आंदोलन करण्यात आले तसेच नांदेड जिल्ह्यातही आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मागण्यांच्या पाट्या घेऊन फोटो काढून सोशल मीडियातून प्रसारीत करण्यात आले तसेच महामहिम राष्ट्रपती यांना सहा.जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात ओबीसींची जनगणना करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा मेडिकलच्या (MBBS,MS,MD) प्रवेशात मागील २-३ वर्षापासून २७ टक्के आरक्षण न देता कपात करण्यात आले होते ते त्वरित भरून काढण्यात यावे व यावर्षातील मेडिकलच्या प्रवेशात ओबीसीचे २७ टक्के आरक्षण भरण्यात यावे. आणि अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती ओबीसी या मागास जात समूहांना संविधानात दिलेल्या आरक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असा सरकारने अध्यादेश काढावा. तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियम निवड पद्धत बंद करून यूपीएससीच्या धरतीवर ऑल इंडिया ज्युडीशियरी सर्विस कमिशनची स्थापना करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन सहा.जिल्हाधिकारी किनवट यांना देण्यात आले या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय पिछडा (ओबीसी )शोषित संघटन किनवट तालुका अध्यक्ष सुनिल ईरावार यांनी सांगितले
यावेळी नारायण पनगंटीवार, बालाजी बामणे,आत्माराम राठोड,विकी कोल्हे, यांच्यासह आदींची उपस्थित होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply