kinwat today news

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आगमन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन झाले. कोविड 19 च्या आजारावर विजय मिळविल्यानंतर त्यांची नांदेड येथे ही पहिलीच भेट असल्याने औत्सुक्य होते. या औत्सुक्यापोटी जिल्ह्यातील काही सामान्य नागरिक भेटीसाठी विमानतळावर दाखल झाले. कोविड 19 हा आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो असा विश्वास नांदेड जिल्हावासियांना त्यांच्या मार्फत मिळाला आहे. मास्क व इतर सुरक्षितता जिल्हावासियांनी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply