kinwat today news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध

किनवट टुडे न्युज।। (26जून)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेबांचे नाव घेण्याची लायकी नसलेल्या भाजप च्या गोपीचंद ने साहेबांविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एल्गार पुकारत निवेदन सादर करण्यात आले.

किनवट माहूर मतदारसंघाचे आपले सर्वांचे आधारस्तंभ मा.आ.प्रदीप जी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ता.अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या समवेत अनिल पाटील क-हाळे, गटनेते जहीर खान, माजी सरपंच प्रवीण म्याकलवार, राहुल नाईक, कचरू जोशी, आशिष केवलसिंग राठोड, बालाजी बामणे मलकवाडीकर, जयवंत वानोळे, राजू सुरोशे, गोविंद अरसोड व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय अधिकारी कार्यालयात किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक अंतर व कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावाचा सरकारच्या सूचनांचे पालन करत निवेदन सादर करण्यात आले. !

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply