kinwat today news

तर नगर परिषद प्रशासनाव्दारे शहरातील उद्रेकी व अनावश्यक प्राणांना चाप लावावा.

किनवट ता प्र दि २४ पुर्वीच्या काळी पोळ्याच्या दिवशी कोणाचे बैल देखणे व जास्त यावरुन त्याव्यक्तीचा रुबाब किती मोठा याची गणना व्हायची परंतु या कलयुगात किनवट शहरात प्रस्थापित व शहरातील रुबाबदार व्यक्तींनी गर्दभ (गाढव) आणल्याने कोणाकडे जास्त गाढव तेवढे त्याचे महत्व जास्त असे स्वरुप आणले आहे, याचे कारण ही तसेच आहे गाढवावरुन रेतीची वाहतुक करणे हा पारंपारीक व्यवसाय असल्याने याला महसुल विभागाकडुन कसल्याही परवानगी व रॉयल्टीची आवश्यकता नसते व एका गाढवाच्या रेती च्या खेपीचे १०० रुपये एवढे प्रचंड दर असल्याने साधारणतः एक गाढव हे दिवसातुन ६०० ते १००० रुपया पर्यंतचे उत्पन्न देते अशा पध्दतीने एखाद्या व्यक्तीकडे ५० ते १०० गाढव असल्यास त्या व्यकतीचे उत्पन्न हे प्रचंड असते त्यामुळे गाढव व त्या गाढवाच्या मालकांना अती महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच मागील काही दिवसापुर्वी महसुल विभागाच्या कर्मचा-यावर या गाढवाच्या मालकांव्दारे मारहाण झाल्याचे प्रकरण ही ताजे आहे.
       परंतु किनवट व गोकुंदा शहर या दोन गावामध्ये साधारणपणे २००० गाढव आहेत आणी त्यांचे मालक त्या गाढवांना दिवसभर राबवुन घेतात व रात्री शहरात मोकळे सोडुन देतात यामुळे शहरातील नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ते गाढव शहरातील मुख्य रस्त्यावरुन, गल्ली बोळातुन, घरासमोरुन एका मागे एक जोरात धावत सुटतात त्यामुळे अनेकदा शहरातील ज्येष्ठ नागरीक जखमी झाले आहे तर लहान बालकांना ही त्यामुळे धोका आहे, काहींना ईजा झालेली आहे. हा त्रास एवढ्यावरच थांबलेला नसुन ते नागरीकांच्या घरा समोर घाण करतात आणी गाढवाची एक विशेषता अशी की ज्या ठीकाणी एका गाढवाने विष्टा केली त्याच ठीकाणी इतर गाढव विष्टा करतात त्यामुळे एकाच ठीकाणी प्रचंड घाण होते. गाढवाच्या मालकांनी गाढवाव्दारे किती ही पैसा कमवुद्या त्यात कोणालाच आक्षेप नाही कारण शहरातील बांधकामांना रेती ही अत्यंत आवश्यक असल्याने तेही महत्वाचे आहे परंतु रात्रीच्या वेळी इतर पाळीव प्राणी ज्याप्रमाणे आपल्या घरात राहतात त्याप्रमाणे या गाढवाच्या मालकांनी देखिल गाढवांना आपआपल्या घरी बांधुन ठेवावे व त्यांच्या चा-या पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा शहरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे मग ते प्रस्तापित असो की नियमित गाढवाव्दारे रेती वाहतुक करणारे असो.
       तर नगर परिषद प्रशासनाव्दारे शहरातील उद्रेकी व अनावश्यक प्राणांना पकडुन शहराबाहेर सोडण्याचे कार्य पार पाडले जाते जसे पिसाळलेले कुत्रे, डुकरे, गाय, बैल म्हैस, परंतु गाढवांच्या बाबतीत किनवट नगर परिषद काहीच करत नसल्याने शहरातील नागरीकांमध्ये प्रचंड रोष आहे या बाबत नगर परिषद प्रशासनाने गाढवांच्या पालकां सोबत चर्चा करुन ही समस्या सोडवाही अशी अपेक्षा शहरातील सुजान नागरीकांनी व्यक्त केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply