kinwat today news

भारतीय जनता पक्षाचे किनवट/ माहुर तालुका संस्थापक सदस्य नारायणराव नेम्मानिवार यांचे दु:खद निधन

⭕ *दु:खद निधन वार्ता* ⭕
किनवट: भारतीय जनता पक्षाचे किनवट/ माहुर तालुका संस्थापक सदस्य आणि या क्षेत्रातील भाजप कार्यकत्यांचे पितामह, जनसंघापासुन अनेक आंदोलनात सक्रिय ,स्व. प्रमोद महाजन,स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत राहुन पक्षात काम केलेले भाजप चे माजी तालुका अध्यक्ष,माजी जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य,अशा विविध पदावर कार्यरत संघ परिवारातील किनवट चे धडाडीचे जेष्ठ नेते नारायणराव नेमानीवार यांचे बुधवार दि.२५ जून रोजी,सायंकाळी ४.३० वाजता किनवट येथील राहत्या घरीअल्प आजाराने दु:खद निधन झाले आहे.
ते म.रा.शि.प.जिल्हा नांदेडचे कार्याध्यक्ष शिक्षकनेते श्री नरसिंगराव यंड्रलवार यांचे सासरे व सौ निवेदिता नरसिंग यंड्रलवार यांचे वडील होत.त्यांचा अंत्यविधी आज दि.25 रोजी रात्री 8 वाजता. वैकुंठधाम स्मशानभूमी धोबीगल्ली किनवट येथे होणारआहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply