kinwat today news

विधानपरिषदेवर पक्षाने संधी दिली तर पक्षाला मराठवाड्यातील समाजासह अनेक कार्यकर्ते ला जोडण्यासाठी रक्ताचे पाणी करू -शरद अडागळे

औरंगाबाद : येत्या विधानपरिषद निवडणूकीत मला पक्षाने संधी दिली तर संधीचे सोने करू व मराठवाड्यातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस ला बळकट करण्यासाठी रक्ताचे पाणी करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद अडागळे यांनी आज समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे

पुढे बोलताना अडागळे म्हणाले कि मी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक राजकीय मिडीया व साहित्यिक क्षेत्रात अविरत कार्यरत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून पक्षात आदरणीय अंकुशरावजी टोपे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हात कार्यरत होतो तसेच सामाजिक कार्य करत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विदर्भातील समाजाला उपेक्षित घटकांना मागासवर्गीय बहुजन लोकांना पक्षाला जोडण्याचे कार्य केले आहे व करत आहेत तसेच मी बदनापुर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा उमेदवारी मागितली आहे
पंरतु पक्षाने संधी दिली नाही येत्या विधानपरिषद निवडणूकीत मला पक्षाने संधी द्यावी याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडे मागणी करून मला संधी द्यावी अशी मागणी केली आहे


पक्षाने या वेळी संधी देवून जनतेची सेवा करण्यासाठी संधी द्यावी अशी अपेक्षा आहे गेल्या दोन दशकांहून अधिक काम केल्यानंतर हि पक्षाने अद्याप कोणत्याही शासकीय कमिटी किवा महामंडळावर सुध्दा संधी दिली नाही तसेच विधानसभेत हि उमेदवारी दिली नाही तरी हि नाराज न होता पक्ष सोडला नाही पडतीच्या काळात हि पक्षात राहुन आदरणीय पवार साहेब अजित दादा पवार सुप्रिया ताई सुळे राजेशभैय्या टोपे यांचे व पक्षाचे विचार जनसामान्यांत मांडून पक्षवाढी साठी कार्यरत आहे तसेच पक्षाने दखल घेवून संधी दिली तर उपेक्षित समाजासह मराठवाड्यात चांगला संदेश पक्षाचा जाईल पक्षाला बळकट करण्यासाठी नेहमीच अविरत पणे कार्यरत राहिल पक्षाने संधी दिली तर ठिक नाही दिली तरी ठिक माझे काम सुरूच राहील चळवळ अधिक गतीमान करण्यासाठी कार्यरत रहाणार अशी अपेक्षा व्यक्त केली

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply