kinwat today news

मातंग समाज अन्याय निवारण समितीचे समन्वयक डॉ .अंकुश गोतावळे च्या प्रयत्नातून लॉकडाउन मध्ये अडकून पडलेल्या मायलेकीसाठी केली फोरव्हिलर गाडीची व्यवस्था

चंद्रपूर: मातंग समाज अन्याय निवारण समितीचे समन्वयक डॉ .अंकुश गोतावळे च्या प्रयत्नातून लॉकडाउन मध्ये अडकून पडलेल्या मायलेकीसाठी केली फोरव्हिलर गाडीची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी चा मार्ग मोकळा करून दिला.

20 मार्च 2020ला “महाकाली देवी “च्या यात्रेकरिता सौ .मंगल अर्जुन जकात रा .पूर्णा जि .परभणी आणि त्यांची दोन लहान मुले व चंद्रभागाबाई नामदेव कावळे या मायलेकी आल्या होत्या आणि 22 तारखेला लॉकडाऊन झाल्यामुळे चंद्रपूर इथेच अडकून पडल्या होत्या .आणि मंदिराच्या परिसरातच त्या राहत होत्या .त्याची माहिती बोरकर सर याना मिळाल्याने त्यांनी मला कळविले .ही माहिती डॉ. अंकुश गोतावळे यांना सांगितली ते काल चंद्रपूर येथे प्रत्यक्ष जाऊन सत्यता पडताळली आणि त्यांना मूळगावी पाठविण्याचा निर्णय सर्वानी घेतला .त्यांच्या आरोग्य तपासणी आणि जाण्यासाठी गाडीची परवानगी स्थानिक कार्यकर्ते श्री राजुभाऊ येले यांनी तातडीने केली तर गाडीभाड्यासाठी खालील बांधवानी सहकार्य केले .त्यामुळे आज सकाळी 10वाजता या भगिनींना रिसोड व पूर्णा येथे सोडण्यासाठी गाडी रवाना झाली ..
गाडीभाडे करीत मदत देणारे समाजबांधव
1)प्रा .बोरकर सर -1000/-
2)श्री .बावणे साहेब -1000/
3)श्री निखाडे साहेब -500/
4)श्री वाघमारे साहेब -500/
5)श्री वानखेडे साहेब -500/-
6)श्री घोसे साहेब -500/-
7)डॉ गोतावळे -2500/-
एकूण गाडीभाडे 6500/-
मदत करणाऱ्या सर्व बांधवांचे आभार ,
सर्वानी अशीच सामाजिक जाणीव ठेऊन सहकार्य करावे .असे आवाहन डॉ .अंकुश गोतावळे समन्वयक -मातंग समाज अन्याय निवारण समिती यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply