kinwat today news

सोयाबिनचे बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर करवाई करण्यात यावी

किनवट: पावसाळा सुरु होऊन बराच कालावधी लोटला तरी देखील बँकाकडून बळीराजाला कर्जप्रक्रीयेची कुठलीही मदत व कार्यवाही अद्यापही झाली नाही . पेरणीसाठी लागणाऱ्या बी बियाणे खतांसाठी बळीराजाची लगबग सुरू असताना देखील केवळ आर्थिक बाबींमुळे बळीराजा अडचणीत आहे यासोबतच सोयाबिनचे बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर करवाई करण्यात यावी यासाठी माननीय आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदशनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक नेम्मानिवार तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक जिल्हाधिकारी किनवट याना निवेदन देण्यात आले

त्यावेळी सोबत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ,उपाध्यक्ष अजय चाडावार,नगरसेवक वेंकट नेम्मानिवार, शिवा आंधले, नरेश सिरमनवार,शिवा ख्यातमवार,मधुकर अन्नेलवार, विश्वास कोल्हारिकर,स्वागत ऐनेनिवार,नरसिंग तक्कलवार, बालकृष्ण कदम,कृष्ण बासटवार,शंकर भंडारे,,श्याम मगर,कैलाश जाधव,रवि चव्हाण, संजय बरेवार, जितेंद्र कुलसंगे,तिरुपति मुंडे ,भाजप कार्यकते व शेतकरीबांधव उपस्थित होते

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply