kinwat today news

आज भाजपा वतीने शेतकऱ्यांना पिक कर्ज दिलेल्या किंवा देणा-या बॅके समोर निदर्शने

किनवट : आज दि.२२ जून २०२०रोज सोमवारी शेतकऱ्यांचे कर्ज वाटप, कर्ज माफी करण्याबाबत राज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य- व्यापी आंदोलन करण्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली आहे. पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे वाटप अद्याप झालेले नाही. त्या अनुषगांने जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज दिलेल्या किंवा देणा-या बॅके समोर सर्व भाजपा कार्यकर्त्यान सह जावून निदर्शने करावयाचे करून शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन निवेदन राज्य शासनास सादर करण्यात आहे.
तरी सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष,युवा मोर्चाचे अध्यक्ष,विविध आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र निदर्शने करण्याच्या सूचना व्यंकटराव पाटील गोजेगावकर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी,नांदेड माननिय आमदार भीमराव केराम साहेब यांचा मार्गदर्शन खाली व भारतीय जनता पक्ष किनवट तालुका संदीप केंद्रे व शहरअध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याचे ता.अध्यक्ष संदीप केंद्रे यांनी कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply