kinwat today news

तालुका शिराळा जि. सांगली येथील डॉ अमीत अशोक घाटगे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत तहसीलदार पदी निवड

किनवट टुडे न्युज।। तालुका शिराळा जि. सांगली येथील डॉ अमीत अशोक घाटगे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या 2019-20 च्या परीक्षेत तहसीलदार पदी निवड झाली.त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी- सद्गुरू आश्रम शाळा,शिराळा येथे,५ वी ते ८ वी- श्री शिव छत्रपती विद्यालय, शिराळा व येथे ,९ वी ते १० वी- माईसाहेब बावडेकर प्रशाला, कोल्हापूर येथे , ११ वी ते १२ वी- विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर तर B.A.M.S.- आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठवडगाव, कोल्हापूर (Internship सहित २०१२ ला पूर्ण) झाले.
त्यांचीसन 2014 – राज्यकर निरीक्षक पदी निवड तर 2017 मध्ये उपशिक्षणाधिकारी पदी तर 2019-20 मध्ये तहसीलदार पदी निवड झाली.डॉ अमित अशोकराव घाटगे यांचे सातत्यपूर्ण यश मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि नवचेतना देणारे ठरणार आहे…
त्यांचा निवडी बद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply