kinwat today news

उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील श्रीकांत तानाजीराव कांबळे यांची तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी वर्ग-१ पदी निवड

किनवट टुडे न्युज: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान घेण्यत आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील श्रीकांत तानाजीराव कांबळे यांची तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी वर्ग-१ पदी वर्णी लागली आहे.


सध्या ते परभणी शहर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.श्रीकांत कांबळे यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण रामराव पाटील प्राथमिक विद्यालय,हंडरगुळी येथे, माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय, अहमदपूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण विज्ञान शाखेतून महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे पुर्ण झाले.२०११ ते २०१५ दरम्यान पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधुन त्यांनी बी.टेक.केले.
त्यानंतर ते पुर्णवेळ स्पर्धा परीक्षेकडे वळले.२०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांची मुख्याधिकारी वर्ग-२ या पदावर निवड झाली.स्पर्धा परीक्षेचा कुठलाही वारसा नसलेल्या श्रीकांत कांबळे यांनी मिळवलेले यश मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि नवचेतना देणारे आहे.भविष्यात होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.श्रीकांत कांबळे यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा..🎉🎊🌷🌷

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply