kinwat today news

महाराष्ट्रातील पहिली मातंग महिला उपशिक्षणाधिकारी:कु.मोनिका रोहीदास(बापू) कांबळे

किनवट टुडे न्युज।। मुळची पुण्याची असलेल्या व शिक्षणात किंवा सातत्य राखण्यात कमी पडणाऱ्या मातंग समाजातील मोनिका रोहीदास कांबळे हिच्या आईवडीलांचे शिक्षण जेमतेम.वडील मनपामध्ये सफाई कर्मचारी.कु.मोनिका रोहीदास कांबळे हीने एस.पी.काॅलेज पुणे येथुन बी.एस्सी.केले.तीची २०१७ मध्ये करनिर्धारण अधिकारी म्हणून निवड झाली.

ती एवढ्यावरच थांबली नाही,स्पर्धापरीक्षेची तयारी चालू असतांनाच एकुलत्या एक भावाच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातुन सावरत २०१८ मध्ये सहाय्यक विक्रीकर निरीक्षक (STI) परीक्षेत राज्यातून SC महिला प्रवर्गातून प्रथम आली.आपल्याकडे एखादी नोकरी मिळाल्यानंतर अल्पसंतुष्ट होऊन तेवढ्यातच समाधान मानणारे बरेच असतात,पण मोनिकासारखे इच्छित यश मिळाल्याशिवाय स्थिर न बसणारे कमीच असतात.आज मोनिका कांबळे महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षणाधिकारी ठरली आहे.तीच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या जिद्दीला सलाम..कु.मोनिका कांबळे हिचे हे सातत्यपूर्ण यश मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि नवचेतना देणारे ठरणार आहे…

कु.मोनिका कांबळे (उपशिक्षणाधिकारी) सह
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेसाठी निवड करण्यात आलेले मातंग उमेदवार
*श्रीकांत कांबळे (तहसीलदार) व
*अमित अशोक घाटगे (तहसीलदार) यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.‌.🎉🎊🌷🌷-शिवा कांबळे(आदर्श शिक्षक)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply