kinwat today news

किनवट पोलीसांच्या हद्दीतील दाभाडी गावात रात्री रेती चोरीस प्रतीबंध करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर रेती तस्करांनी केला प्राणघातक हल्ला. हल्ल्यात चार पोलीस जखमी

किनवट: किनवट पोलीसांच्या हद्दीतील दाभाडी गावात शुक्रवारी (१९ जून) रात्री रेती चोरीस प्रतीबंध करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले असून पोहेकाँ.आप्पाराव राठोड यांच्या डोक्यात फावडे घातल्याने गंभीर जखमी आहेत. दरम्यान आज अतिरीक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी किनवट पोलीस ठाण्यास भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

दि.१९ जूनच्या उत्तररात्रीचे जवळपास ११.३० वाजताचे दरम्यान किनवट पोलीसांचे पथक रेतीचोरीस प्रतीबंध करण्याच्या गस्तवर असतांना जमावबंदी, संचारबंदी आदेश झुगारुन अनेकजन आढळून आले. त्यांनी पोलीसांच्या कामात व्यत्यय आणून सुरेश पुलकुटे, गजानन चौधरी, आप्पाराव राठोड व कालबुधे यांना जब्बर मारहान केली. त्यात राठोड गंभीर जखमी झाले असून, पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. सदर प्रकरणी किनवट पोलीसात १७ आरोपी विरुद्ध गु.नं. २३१/२०२० कलम ३०७,३५३,३३२,३३३,३४१,३७९,४२७,१४३,१४७,१४८,१८८ भादंवि सह कलम १३५ मपो कायद्यान्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे हे करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. १७ आरोपी पैकी मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर, महादेव अंकूश पांढरे, ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे या सात जणांना अटक केली असून, दुपारी किनवट न्यायालयासमोर उभे केले असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व ‘जर पोलिसांवर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर आम्हाला दोशींवर कठोर पावले उचलावी लागतील’ असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.
किनवटपासून २०-२० किमीच्या वर्तुळात प्रचंड साठेबाजी करण्यात आली असून अजूनही चालूच आहे. त्या साठ्यांना नाममात्र दंड आकारुन वाहतूक करण्याची परवानगी दिल्या जाऊ शकते. रेतीघाटाचा लिलावच नसतांना घरकुल बांधकामाच्या बहाण्याखाली रेती लांबवली जात आहे. घरकुलांची त्यांच्याकडे यादी नसतांना वाहतूक परवानगी मिळतेच कशी ? हा एक यक्ष प्रश्न आहे. यास तहसिलदारांची संमती आहे ? नसेल तर त्या-त्या ठिकाणच्या तलाठी आणि मंडळाधिका-यांवर दखलपात्र करण्यात यावी. रेतीतस्करांचा उच्छाद म्हणजे तहसिलदारांना बदनाम करण्याचा असु शकतो. तहसिल कार्यालया समोरुन दिवसा रेतीचे ट्रॅक्टर राजरोसपणे आणल्या जात आहेत. या घटनेतून सर्वच संबंधित विभागांनी बोध घेऊन रेतीतस्करी थांबऊन पर्यावरण संतुलीत राखण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “किनवट पोलीसांच्या हद्दीतील दाभाडी गावात रात्री रेती चोरीस प्रतीबंध करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर रेती तस्करांनी केला प्राणघातक हल्ला. हल्ल्यात चार पोलीस जखमी

 1. You are so interesting! I don’t believe I have read something like this before.
  So good to discover another person with unique thoughts on this
  subject. Seriously.. many thanks for starting this up. This web site is something
  that is required on the web, someone with a bit of originality!
  adreamoftrains website hosting companies

Leave a Reply