kinwat today news

बनावट बियाणे विकणाऱ्या कंपनी आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार हेमंत पाटील

नांदेड :खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी विकत घेतलेले सोयाबीन पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून यावर खासदार हेमंत पाटील यांनी यावर आक्रमक भूमिका घेत बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि गॅरंटीवर बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली असून तसे निर्देश हिंगोली ,नांदेड यवतमाळ जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याना दिले आहेत .

यंदाच्या खरीप हंगामात मृगाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरयांनी पेरणीची घाई केली यासाठी बाजारातून चांगल्या कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले कृषी विक्रेत्याकडून घेतलेल्या विविध कंपन्यांचे बियाणे वांझ निघाले ते बियाणे उगवलेच नाही . तसेच काही ठिकाणी खरेदी विक्री संघाकडून खरेदी केलेले महाबीज चे बियाणे सुद्धा उगवले नाही . हिंगोली मतदार संघातील सर्वच उमरखेड महागाव तालुक्यातील तरोडा , कृष्णापूर, पाऊणमारी , मुळावा,मानेगाव ,जेवली, मथुरानगर , वरुड ( बीबी ) आदी गावातील १४३ शेतकरयांनी इतर तालुकयातील शेतकरयांनी कृषी विभागाकडे आणि खासदार हेमंत पाटील यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या याची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि विक्री करणारे विक्रेते यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली असून कारवाई करण्याचे निर्देश हिंगोली,नांदेड,यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक ,आणि कृषी अधिकारयांना दिले आहेत . कोरोनामुळे आधीच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यावर बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट दाढीवाले आहे . मागील बऱ्याच दिवसापासून हिंगोली ,यवतमाळ ,नांदेड जिल्हयात कापूस , सोयाबीन चे बोगस बियाणे विक्री होत असल्याचे बोलले जात होते पण याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे बोगस बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांची हिंमत धजावली आहे .जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यात व्यस्त असतानाही कृषी विभाग या सर्वातून गाफील राहिल्यामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे विकल्या गेल्याची तक्रार शेतकरीच करत आहेत. तर काही ठिकाणी महामार्गाचे काम चालू असून त्यामुळे पुलाच्या ठिकाणी पाणी साचल्याने हजारो हेक्टर वरील पेरलेले बियाणे वाहून गेले असल्याने सुद्धा शेतकरी हैराण झाले आहेत याबाबत सुद्धा खासदार हेमंत पाटील जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत . अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी नेहमीच भरडला जात आहे पण शेतकरयांच्या प्रश्नबाबत खासदार हेमंत पाटील सदैव प्रथम प्राधान्य देऊन भूमिका घेत असतात.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “बनावट बियाणे विकणाऱ्या कंपनी आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार हेमंत पाटील

Leave a Reply