kinwat today news

कु. तृप्ती फोले हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत यश

किनवट(तालुका प्रतिनिधी ) किनवट तालुक्यातील शिवणी पासून जवळच असलेल्या सोनवाडी येथील विध्यार्थीनी कु. तृप्ती दत्ता फोले हिची जवाहर नवोदय विद्यालय वसमत जि हिंगोली येथे
वर्ग ई.सहावीत प्रवेशासाठी निवड झाली आहे. नवोदय विद्यालय समिती मार्फत देशातील नवोदय विद्यालया मधील सहावीत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते या वर्षी ही परीक्षा ११जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली होती कोरोना १९ वाढत्या संसर्गामुळे या परीक्षेचा निकाल लाबवलां होता तो निकाल १९ जुन २०२० रोजी घोषित करण्यात आला या निकालात सोनवाडी या छोट्याशा आदिवासी गावातील कु.तृप्ती दत्ता फोले हिची वसमत येथील नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. आपल्या ह्या यशाचे श्रेय आजी आजोबा, आई,वडील, आत्या, मामा, काका, काकु, व तिच्या शाळेतील शिक्षकांना दिले आहे.
या यशा बद्दल किनवट प .स.चे उपसभापती कपिल करेवाड व कृ. ऊ. बाजार समिती ईस्लापुर चे उपसभापती बालाजी आलेवार,डॉ. माधव फोले,पत्रकार भोजराज देशमुख,प्रकाश कार्लेवाड,जी.जी. तरटे,डॉ. कविता फोले यांनी कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply