kinwat today news
video-:-राज्यातील-कापूस-खरेदीस-हिरवा-कंदील

आफलाइन’च्या नावाखाली शेतकरी भरडला..! सीसीआयची खरेदी शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी..?

किनवट (तालुका प्रतिनिधी) जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल किनवट विधानसभा मतदार संघातील एकमेव कापूस संकलन केंद्र पण ज्यामुळे हक्कदार गरजू शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद करून सुद्धा शेकडो शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न करता ऑफलाइन चे निमित्त करून व्यापाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध साधून शेतकऱ्यांचाच नावे व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी करून माझ्यावर अन्याय केला असा लेखी आरोप मौजे टाकळी तालुका माहूर येथील शेतकरी संतोष मुसळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ाठवला असून दोषी अधिकारी कर्मचारी आणि व्यापार्‍यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, श्रीक्षेत्र माहूर तालुक्यात शासनाने कापूस संकलन केंद्र सुरू केले नसल्यामुळे शेजारीच असलेल्या किनवट तालुक्यातील चिखली येथील कापूस संकलन केंद्रावर माहूर तालुक्यातील कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विक्री करण्याचे आम्हाला फर्मावले, त्यानुसार ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले तसे मी सर्व रितसर नोंदणीही केली, मला कोणता लघुसंदेश येईल याच भ्रमात मी बसलो पण मला काही संदेश आला नाही, ऑनलाईन नोंदीच्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा असे शासनाचे निर्देश असताना त्यास ठेंगा देत व्यापारी धार्जिन या व्यवस्थेने ऑफलाइन खरेदीला सुरुवात केली आणि माझ्या विनंतीवरून व माझ्याकडून पैसे घेऊन पावती न देताच टोकन दिले पण माझ्या गाडीतला केवळ चार क्विंटल कापूस घेऊन मी त्यांची आर्थिक मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे माझी गाडी परत केली, अशी खंत शेतकरी मुसळे यांनी आपल्या लेखी निवेदनात मांडली असून असाच प्रकार किनवट माहूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसोबत झाला आहे. मोठा गाजावाजा करत सदर कापूस संकलन केंद्राचे तीन वेळा उद्घाटन केलेल्या पुढाऱ्यांचा मात्र शेतकऱ्यावर चा बेगडी पुळका या निमित्ताने उघड झाला आहे. शेतकऱ्यांचा वाली तरी कोण ? असा प्रश्न निर्माण झाला असून सदर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार? हे पुढील काळातच समजेल..

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply