kinwat today news

भा.ज.पा च्या नांदेड ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबूराव केंद्रे यांची नियुक्ती तर गोविंदराव अंकुरवाड यांची भाजपाच्या आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड.

किनवट प्रतिनिधी-:    भारतीय जनता पार्टी नांदेड ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी किनवट येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व ओबीसी नेते बाबूराव केंद्रे यांची नियुक्ती तर किनवट येथील आदिवासी समाजाचे नेते व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गोविंदराव अंकुरवाड यांची भाजपाच्या आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.

दोघांच्याही नियुक्ती चे पत्र किनवटचे लोकप्रिय आमदार माननीय भिमरावजी केराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,
ऍड.रमण जायभाये,माजी नगरउपाध्यक्ष श्रीनीवास नेमानिवार,सभापती दत्ता आडे,उपसभापती कपिल करेवाड,आढावा समिती अध्यक्ष भगवान हुरदूके, शिवा क्यातमवर, शिवा आंधळे, माधव डोकळे,नीलकंठ कातले,डॉ. नामदेव कराड,सागर पिसारीवर,विवेक केंद्रे,श्रीरंग पवार,फिरोज तवर,प्रताप पडवळ,गजानन आरमाळकर,किशन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या दोन्ही माजी तालुका अध्यक्ष नी आपापल्या काळात पक्षवाढीसाठी योगदान लाभले आहे.त्यांची पक्षाधील सक्रियता पाहून त्यांची जिल्हाध्यक्षपदी पक्षश्रेष्ठींनी नियुक्ती केली आहे. आपल्या सक्रीयते मुळे आगामी काळात पक्षाला फायदा होईल. पुढील कार्यास शुभेच्छा. असे पत्राद्वारे जिल्हाध्यक्ष गोजेगावकर यांनी कळविले आहे.
या दोनही ही नेत्यांची निवड जिल्हाध्यक्षपदी झाल्यामुळे त्यांचा अनुभवांचा फायदा किनवट /माहूर विधानसभा मतदारसंघात नक्कीच होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातून व जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिवंदनाचा वर्ष होत आहे.त्यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केल्यामुळे त्यांचे आभार बाबुराव केंद्रे व गोविंद अंकुरवाड यांनी मानले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

7 thoughts on “भा.ज.पा च्या नांदेड ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी बाबूराव केंद्रे यांची नियुक्ती तर गोविंदराव अंकुरवाड यांची भाजपाच्या आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड.

Leave a Reply