kinwat today news

लहान मोठ्या व्यापाऱ्यांना विनाकारण वेठीस धरून अरेरावीची भाषा करणाऱ्या बिराजदार यांचेवर कार्यवाही करण्याची नगरसेवक शिवा आंधळे यांनी केली मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

किनवट (प्रतिनिधी) किनवट नगरपरिषद कार्यकक्षामध्ये कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातील कर्मचारी बिराजदार यांच्याकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करत असणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना विनाकारण वेठीस धरून अरेरावीची भाषा करणाऱ्या बिराजदार यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक शिवा आंधळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना या महामारीचा किनवट शहरामध्ये कसलाही शिरकाव नाही याचा श्रेय नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांसह येथील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना जातो येथील व्यापारी लॉक डाऊन काळापासून ते अनलॉक मध्ये सुद्धा कोरोना विषयक नियमांचा काटेकोर पालन करत असताना येथील रोखपाल पदावर कार्यरत असलेले पालिकेतील कर्मचारी बिराजदार यांनी शहरांमध्ये दबंग’गिरी करत लहान-मोठ्या व्यापारांना वेठीस धरून कार्यवाही करण्याची धमकी देत असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
शहरातील व्यापारी लॉक डाउन काळापासून ते अनलॉक मध्ये सुद्धा शासनाने दिलेल्या नियमांचा काटेकोर पालन करत असताना नपचे कर्मचारी बिराजदार यांनी वारंवार वेठीस धरून अरेरावीची भाषा करत असल्याने येथील व्यापाऱ्यांनी काही नगरसेवकांसह थेट नगरपालिका गाठून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आपले घराणे मांडत कार्यवाही करण्याची मागणी केली यावरून प्रभाग क्रमांक सहा चे विद्यमान नगरसेवक यांनी संतापलेल्या व्यापाऱ्यांना समज देऊन मुख्य अधिकारी यांच्याकडे संबंधित बिराजदार यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी लेखी स्वरूपात दिल्यामुळे मुख्य अधिकारी बिराजदार यांच्यावर कोणती कार्यवाही करणार याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply