kinwat today news

राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी संपावर

/>किनवट( आनंद भालेराव ) : आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार साकडे घालत आहेत परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने देवून त्यांच्या रास्त मागण्याकडे वारंवार शासनामार्फत व प्रशासनामार्फत दुर्लक्ष करण्यात येते

.


कोव्हीड-१९मध्ये जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समकक्ष रिक्त पदावर बिनशर्त समायोजन करावे, या व इतर न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात किनवट येथील एएननएम व कर्मचारी सोमवार ( दि. १५ ) पासून सहभागी झाले आहेत.

अर्बन एएनएम रत्नमाला एम.नागभिडे, एस.के.तायडे, एस.बी.चव्हाण व पि.एच.सी. ए.एन.एम. वदना मेश्राम, डिंपल पवार,एस.एस. शेंडे,एस.जी. मांढरे,एस.डी. वानखेडे, तालुका समूह संघटक जनार्धन काकडे, लेखापाल प्रदीप देशमुख, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रदीप शिन्दे यांनी आमदार भीमराव केराम व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ संजय मुरमुरे याना निवेदन दिले.
मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले की, आजपर्यंत कोणतीही सकारात्मक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात आलेती नाही , तसेच सर्व प्रथम कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड -१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला. तरीही मृत्यूच्या दाढेत जाऊन कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. असे असतांना सुष्दा मुख्यमंत्री महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकान्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. करीता शासनाला आमची गरज नसल्यास , आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातीत कंत्राटी कर्मचान्यांमध्ये दिसुन येत आहे. आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १०००० रिक्तपदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणान्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळती आहे .
राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतले नसत्यामुळे दि .१५ / ०६ / २०२० पासून शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतला संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी महासंघाकडुन राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असेही नमूद केले आहे.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “राष्ट्रीय आरोग्य अभियानातीत कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी संपावर

 1. We stumbled over here coming from a different web page
  and thought I might as well check things out.

  I like what I see so i am just following you. Look forward to
  looking at your web page repeatedly.

Leave a Reply