kinwat today news

लोकसभेत विकास कामासाठी विक्रमी चर्चा

नांदेड: लोकसभा सदस्य म्हणून एक वर्ष पूर्ण झाले आहे, या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आपण इतरां पेक्षा अधिक वेळा सरकार कडे पाठपुरावा केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकास केला आहे. असे सांगून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकसभेत विकास कामाच्या चर्चेचा विक्रम झाला असे ही स्पष्ट केले. मुदखेड मोंढा मैदानावर आयोजित कार्यक्रमात विरोधकांवर आक्रमक भूमिका घेतली. युवकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे दिप प्रज्वलित करून उद्घाटन खा. चिखलीकर यांनी केले. मोदी सरकारने एकवर्षाचा लेखाजोखा मांडण्यात आला. भारतीय जनता पक्षात असंख्य सक्रिय कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश घेतला आणि काँग्रेस संघटना खिळखिळ केल्याचे खासदार यांनी दाखवून दिले. यंदा च्या सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन कमळे यांच्या सह सुरणे, संबोड, गारप्पले, गुंठे आदींनी प्रवेश घेतला. या प्रसंगी मुख्य आयोजक तथा भोकर विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा युवा अध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, ज्येष्ठ जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांनी केंद्र सरकार आणि खासदार व भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला कशी मदत करत आहेत हे सांगीतले. या कार्यक्रमाला प्रमुख श्रावण भिलवंडे, प्रताप पावडे,मिलिंद देशमुख, प्रवीण साले, लक्ष्मण इंगोले,माजी जिल्हा परिषद सदस्य भालेराव, गणेश शिंदे, नागोराव भांगे, आनंद डांगे, प्रवीण गायकवाड महिला अध्यक्ष जयश्री दिलीप देशमुख यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे खासदार चिखलीकर यांनी महिला गृह उद्योगाचे युनिट सुरू करण्यात प्राधान्य दिले व वेगळा ठसा उमटविला. खासदारांनी फुलांचे पार्सल टाकण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वे गाड्या थांबवण्यात आले,या प्रश्नाकडे आपण लक्ष दिले , लोकसभा मतदारसंघात एका टप्प्या मध्ये शंभर किलोमीटर रेल्वे मार्ग लवकर विद्युतीकरण केले जावे यासाठी आपण प्रयत्न करित आहोत नांदेड जिल्ह्य़ात लवकरच विद्युत चा वापर करून रेल्वे गाडी धावणार आहे.अशी माहिती दिली. तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड, दिगंबर टिप्परसे, प्रल्हाद हाटकर, कुणाल चौधरी, बालाजी शेंबोलीकर, बालाजी पवार, प्रकाश बलफेवाड, अमोल अडकणे,गोविंद गोपनपले, मुन्ना चांडक, अमोल आबादार,देवा धबडगे, सुभाष मगरे,कालीदास जंगीलवाड, राहुल कोठेवाड, कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply