kinwat today news

मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यात १,८५,८२१ पाठ्यपुस्तकांचे संच वाटप होणार

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत गट साधन केंद्र, किनवटच्या वतीने तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना १,८५,८२१ पाठ्यपुस्तकांचे संच मोफतवाटप होणार आहे. मंगळवार (दि. १६ ) पर्यंत १६ केंद्रांतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुस्तके हस्तगत केली असून तालुक्यातील ८० टक्के शाळांपर्यंत पुस्तके पोहचली आहेत, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून रविवारी सात जून रोजी इयता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली होती. समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरणास शैक्षणिक वर्षाच्या शाळारंभाच्या आधीपासूनच जिल्हा परिषद ( मुलांचे ) हायस्कूल, किनवट येथे प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उत्तम कानिंदे, विषय तज्ज्ञ बाबूराव इब्बीतदार, दत्तात्रय मुंडे, धानोरा (बे ) शाळेचे मुख्याध्यापक माधव भिसे, आनंदवाडीचे श्रीहरी मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यावर्षी इयत्ता- पहिली ते आठवीच्या सर्व विषयांची मराठी; उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे वर्गनिहाय संच खालील संख्येनुसार वितरित केले जाणार आहेत :
वर्ग- पहिला -१६९८८ , दुसरा-१६९८८ , तिसरा- २१४४०, चौथा- १९५५९, पाचवा- २४९८६, सहावा- २९३३९,सातवा-२९३०९ ,आठवा-२७२१२ याप्रमाणे एकूण संच १८५८२१.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर ठेऊन व मास्क वापरूनच वाटप होत आहे. मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी विभाग प्रमुख दत्तात्रय मुंडे, एस.एन. ब्राह्मण यांचेसह सर्व विषय तज्ज्ञ व विषय शिक्षक आदी परिश्रम घेत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply