kinwat today news

नैसर्गिक आपत्तीत राष्ट्रीय महामार्गावरील पुल व रस्त्यावरील खड्यांचे काम सबंधित यंत्रणेमार्फत तातडीने पूर्ण करण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आदेश

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हा मुख्यालय ते उपविभागाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुल व रस्त्यावरील खड्यांचे काम उपविभागीय अभियंता सा.बां. ( रा.म. ) उपविभाग किनवट व माहुर यांनी त्यांचे अधिनस्त यंत्रणेमार्फत तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अभिनव गोयल ( भा.प्र.से ) यांनी दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांनी दिनांक १२.०५.२०२० रोजी बैठकीचे आयोजन करुन विस्तारीत स्वरूपात मान्सूनपुर्व नियोजनाबाबत निर्देश दिलेले होते. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिनांक १४.०५.२०२० रोजी आढावा बैठक घेण्यात येवून मान्सूनपुर्व नियोजनाबाबत व्यापक स्वरूपात निर्देश दिलेले आहेत. ज्यात पावसाळ्यात महामार्मावर वाहतुक खोळंबुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी तसेच नदी, नाल्यावरील पुल सुस्थितीत व रत्यावरील खड्डे यांची पाहणी करून जिथे तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक आहे तिथे कंत्राटदाराकडून प्रचलित नियमाप्रमाणे दुरुस्ती करून घेण्यात यावी. असे सूचविले होते.
ज्याअर्थी सध्या मान्सुनचे आगमन होत आहे काल इस्लापुर येथे ८५ मी.मी. पावसाची नोंद झालेली असुन किनवट या उपविभाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालु असुन पावसाळ्यात आवागमन करतांना जनतेला त्यावरील खड्यांचा सामना करावा लागत आहे. ज्याअर्थी कोविड -१९ आजाराची साथ राज्यात सुरू असल्याने रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण मुळ ग्रामीण भागातील रहिवासी शहरातुन परत ये जा सुरू झालेली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार या उपविभासाठी Incident Commander म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांनी घोषित केल्यानुसार मला प्राप्त अधिकारान्वये मी अभिनव गोयल ( भा.प्र.से ), सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी किनवट उपविभागांतर्गत दोन्ही तालुक्यातील अधिनस्त उपविभागीय अभियंता सा.बां. ( रा.म. ) उपविभाग किनवट व माहुर यांनी त्यांचे अधिनस्त यंत्रणेमार्फत या महामार्गावरील पुल व खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत. जर कंत्राटदार यांना कंत्राट दिलेले असतील तर त्यांचेकडून सदर काम प्राधान्याने करून घेण्याबाबत आदेशीत करित आहे. सदर कामी दिरंगाई केल्याचे आढळून आल्यास त्यांचे विरुध्द महाराष्ट्र कोविड – १९ उपाययोजना नियम २०२० मधील तरतुदी , भारतिय दंड संहितेचे कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५३ व १४ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असेही सोमवारी ( दि. १५ ) निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply