kinwat today news

किनवट वीज वितरण कंपनीचा खेळखंडोबा शहरात वारंवार विज गुल.

किनवट प्रतिनिधी: किनवट शहरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. विद्युत पुरवठा चा दाब कमी जास्त होत असल्यामुळे घरातील फ्रीज, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत.

तर काही जळून जात आहेत. कंपनीच्या कनिष्ठ अभियंता परचाके यांना विचारले असता त्यांनी गोकुंदा येथील वीज पुरवठा संचात बिघाड झाल्यामुळे वीज वारंवार जात असल्याचे सांगितले. तसेच या बाबतीमध्ये वरिष्ठाकडे माहिती देण्यात आली असून या समस्या दूर करण्यासाठी नांदेड हुन अभियंत्यांना पाचारण करण्यात आल्याचे तसेच सदरील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागणार असल्याचे सांगितले.अभियंता उईके यांचा कार्यालयीन मोबाईल वारंवार बंद येत आहे तो चालू ठेवण्यात यावा.अशी मागणी जनतेतून होत आहे. किनवट शहरामध्ये वितरण कंपनीच्या माध्यमातून पावसाळ्या पूर्वीची कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे झाली परंतु ठिकाणची कामे होणे बाकी आहे. लवकरात लवकर करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply