केंद्रशासनाच्या विविध कल्याणकारी ऐतिहासिक निर्णयाची माहिती देण्यासाठी इस्लापुर भाजपची बैठक

किनवट ता.प्रतिनिधी
जगप्रसिद्ध लोकप्रिय नेते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात अनेक देशहिताचे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. याबाबतची माहिती देण्यासाठी भाजपाच्या वतीने दिनांक 15 रोजी आत्मनिर्भर अभियानाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी ऐतिहासिक निर्णयाची माहिती किनवट-माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये दिली. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष गोविंद अंकुरवाढ यांनी आपले मनोगतातून मोदी सरकार च्या योजनेबद्दल ची सविस्तर माहिती देऊन केंद्र सरकारच्या उपायोजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार भीमराव केराम, माजी मंत्री डी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन माजी तालुकाध्यक्ष गोविंद अंकुरवाड यांनी बैठकीत केली. या बैठकीत सरपंच देविदास पळसपुरे माजी पंचायत समिती सदस्य मारोती माहुरकर, उपसरपंच श्रीरंग पवार, माजी सरपंच पांडुरंग जाधव, माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन कदम, बालाजी पाटील पांगरीकर, ग्रामपंचायत सदस्य पप्पू तोटालवाड, प्रकाश दंडे, शेख लतीफ, शेख अजीज, सुशिल जोशी, संजय गोळेकर, मरीबा महाजन यांच्यासह या बैठकीस भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.