kinwat today news

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक अश्वीनी ठवरे यांची नांदेड येथे बदली निमित्त निरोप समारंभ व सत्कार आयोजीत करण्यत आला

शहर प्रतिनिधी किनवट: ( राजेश पाटील)
किनवट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक अश्वीनी ठवरे यांची बदली नांदेड येथे झाल्यामुळे त्या निमित्त सत्कार व निरोप समारंभ असा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक ओ.एम. शेख हे होते तर मंचावर नव्याने रुजु झालेले सहायक व्यवस्थापक राहुल दवणे, विलास ठवरे, राजश्री उईके, नागेश इंगळे, गृहलक्ष्मी ग्राम विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ . संगीता पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना नागेश इंगळे यांनी मांडली व अश्वीनी ठवरे यांच्या कार्याचा परिचय सांगीतला यानंतर शाखा व्यवस्थापक मा . शेख यांनी ठवरे यांच्या कार्यकाळातील कामाचे कौतुक केले या नंतर सौ.संगीता पाटील यांनी ठवरे यांनी बँकेला कशा प्रकारे सेवा दिली व आपल्या मनमिळावु स्वभावामुळे बँकेचे खातेदार वाढवले व ग्राहकांच्या समस्या कथा प्रकारे सोडवल्या या बद्दल आपले विचार मांडले यानंतर खातेदारानी आपले मनोगत मांडले यावेळी अश्वीनी ठवरे यांना बँकेतील कामाचा अनुभव कर्मचाऱ्याचां सहवास या बद्दल आपले विचार प्रकट केले .
या वेळी बालाजी वानखेडे , परवेझ शेख, आत्मानंद सोनकांबळे , अनिकेत वानखेडे , पंडीत वानखेडे, पृथ्वीराज ठाकरे, विनायक गव्हाणे, NGO स्टाफ रुचीता फुलझेले, राजेश पाटील , यांची उपस्थीती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंढरीनाथ ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बामणाजी वंजारे, संकेत वंजारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply