kinwat today news

मौजे सरसम येथे विज पडून एकाचा मृत्यू.

हिमायतनगर प्रतिनीधी (राजु गायकवाड). मौजे सरसम येथे शेतमजूर . सुभाष दिगांबर गुंडेकर वय ४८.रा.सरसम ता.हिमायतनगर जि.नांदेड शेतमजूर.विजयराव देशमुख यांच्या शेता मध्ये जनावर चारत असताना अचानक पाऊस व विजांचा कडकडा झाल्याने झाडाखाली जातं असताना त्यांच्यावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

सदरील व्यक्ती अतिशय गरीब कुटुंबातून असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या कुटुंबास तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी.पालकमंत्री सहाय्यता निधी.आमदार स्थानिक विकास निधी.कार्यक्रम निधी.खासदार निधी.आपत्य. निर्वाण निधी.तहसील कार्यालय कडुन आर्थीक मदतीची गावकऱ्या कडुन मागणी होत आहे.‌त्यांच्या पशात पत्नी. एक मुलगी.दोन मुले. वडील.बहीन.असा परीवार असुन.एका शेत मजुरांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यांने गावावर शोककळा पसरली.

सदरील घटनास्थळी सरसम सज्जाचे तलाठी सतिष दंतुलवाड. मंडळधिकारी मनोज खंदारे . पोलीस पाटील.आदी कर्मचारी या वेळी हजर होऊन घटनेचा पंचनामा करीत असल्याचे सांगितले जात आहे.गरीब शेत मजुराला तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळणार काय?.गरीब दलित शेतमजूर यांची आर्थिक परिस्थिती नाचुक असल्याने. कीत्येक दिवसांपासून शेतमजूर व साल गडी काम करीत होते.दि.१४/०६/२०२० दुपारी ४:५२ वाजता सरसम शिवारामध्ये विजय देशमुख यांच्या शेतात जणांवर चारत असताना अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजुला जातं असताना विज पडून जागीच मृत्यू झाला.
अशा संकटं समय त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन.सहकार्य करण्यासाठी हिंगोली लोकसभा खासदार.हेमंत पाटील.पालकमंत्री अशोकराव चव्हाण.हदगाव हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी जिल्हा अधिकारी डॉ.विपीन ईटनकर उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तहसीलदार एन.बी जाधव.यांनी तातडीने आदेश देऊन आर्थिक मदतीची मागणीचे जोर धरत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply