kinwat today news

किनवटमध्ये विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

किनवट – (ता.प्र.) दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढलेल्या एका लाईनमनचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी ( दि.१३ ) रात्री साडेआठ च्या दरम्यान घडली.  

शहरातील सुभाषनगर, (मथुरानगर) भागातील वीज रोहित्रावर शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमन शेख सलीम शेख नब्बु ( वय ४०, रा.निचपूर ) हे खांबावर चढले होते. याच दरम्यान वीजपुरवठा सुरु झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून लाईनमन शेख सलीम हे खांबावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी तेलंग यांनी सलीम शेख यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेचे वृत्त कळताच लाईनमन शेख यांच्या नातेवाईकांनी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करुन सलीम यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या दुर्घटनेसंदर्भात चौकशी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कार्यालयाने दिलेला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी घटनेबाबत सारवासारव केली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply