kinwat today news

किनवट पंचायत समितीचे बी.डी.ओ. यांनी दिव्यांगाचा निधी वाटप करण्याचे दिले लेखी आदेश.

किनवट टुडे न्युज।।       मौजे मलकवाडी ,खंबाळा, आंदबोरी, भूलजा या गावातील पाच दिव्यांग लाभार्थींना गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग निधी वाटप केला गेला नाही. अशी तक्रार अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना किनवटचे सचिव राज माहुरकर यांनी दिली होती. आणि सदर तक्रारीचा पाठपुरावा व प्रसिद्धी किनवट टुडे न्युज केली होती.

त्यामुळे संबंधित प्रशासन खरवडून जागे झाले व किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना तीन वर्षाचा पाच टक्के राखीव निधी वाटप करण्याच्या लेखी सूचना सदर ग्रामसेवकाना देण्यात आल्या. किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील हा दिव्यांगाचा पाच टक्के राखीव निधी चर्चेत आला असून हाच विषय व गोकुदा ग्रामपंचायत मध्ये होता आणि तोही विषय अखिल भारतीय कामगार संघटनेचे सचिव यांनी पुढाकार घेऊन 8 हजार शंभर रुपये वाटप करण्यात आले होते.
गोकुंदा येथील दिव्यांगना न्याय मिळाला तसाच प्रकार मलकवाडी, खंबाळा, अंदबोरी, येथे घडला असून तो ही माहुरकर यांनी चव्हाट्यावर आणत प्रशासनाला जाग आणली. आणि किनवट पंचायत समितीचे बी.डी.ओ. यांनी सदर निधी वाटप करण्याचे आदेश ग्रामसेवकांना लेखी मध्ये दिले आहेत. पण “नॉट रिचेबल प्रेमी ग्रामसेवकांना” दिव्यांगा विषयी असलेली सहानुभूती जागी व्हावी आणि लवकरात लवकर यादिव्यांगांना न्याय मिळावा अशी मागणी दिव्यांगातुन पुढे येत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply