नांदेड जिल्ह्यात 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ; बाधितांमध्ये 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश ; दोन बाधित व्यक्ती बरे झाल्याने सुट्टी;एकुण पॉझिटिव्ह संख्या 224

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 21 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 224 वर पोहचली आहे. आज या 21 बाधितांपैकी 13 पुरुष तर 8 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 67, 62, 55, 52, 45, 41, 38, 35,28,26 व 16 वर्ष वयाचे तीन पुरुष तर महिलांमध्ये 52, 50, 38, 30, 28, 26 व 10, 3 वय वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. पंजाब भवन यात्री निवास येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 139 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.

गुरुवार 11 जून रोजी प्राप्त झालेल्या 89 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. नवीन 21 पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये चौफाळा भागातील 1 स्त्री (वय 52 वर्षे), फरांदेनगर भागातील 1 पुरुष (वय 52 वर्षे), खोजा कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 67 वर्षे), उमर कॉलनी भागातील 1 पुरुष (वय 16 वर्षे), देगलूरनाका भागातील 2 व्यक्तींमध्ये 1 स्त्री (वय 26 वर्षे) व 1 पुरुष (वय 16 वर्षे), इतवारा भागातील 5 व्यक्तींपैकी 4 पुरुष (वय 16,26,28,62 वर्षे) व 1 स्त्री (वय 50 वर्षे), तसेच गुलजारबाग भागातील 8 व्यक्तींपैकी 3 पुरुष (वय 35,41,38 वर्षे) व 5 स्त्री (वय 3, 10,28,30,38 वर्षे) असे आहे. तसेच मुखेड शहरातील 2 पुरुषांपैकी होळकरनगर येथील 45 वर्षाचा 1 व्यक्ती तर विठ्ठलनगर परिसरातील 55 वर्षाचा 1 व्यक्तींचा यात समावेश आहे. या सर्व व्यक्तींची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.

औषधोपचार सुरु असलेल्या 74 बाधितांपैकी 3 व्यक्तींमध्ये 65 वर्षाची 1 महिला तर 74 व 38 वर्षाचे 2 पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची एकुण संख्या 11 झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 74 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 51, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 1 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे. गुरुवार 11 जून रोजी 62 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 222,
घेतलेले स्वॅब 4 हजार 711,
निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 154,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 21,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 224,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 181,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
मृत्यू संख्या- 11,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 139,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 74,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 62 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.