kinwat today news

किनवट शहरातील सराफा लाईन,जुनी कापड लाईन या भागात एसबीआय चे एटीएम बसविण्यात यावे- सतीश राऊत

किनवट: किनवट शहरातील सराफा लाईन, जुनी कापड लाईन या भागात एसबीआय किंवा इतर कोणतेही बँकेचे एटीएम बसविण्यात यावे अशी मागणी या भागातील व्यापारी व नागरिकांतून होत आहे.

किनवट शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले सराफा लाईन या भागांमध्ये अनेक व्यापारी वर्ग असून रामनगर ते एस बी आई एटीएम पर्यंत कमीत कमी एक ते दीड किलोमीटरचे अंतर आहे.तसेच या एटीएम वर ग्रामीण भागातील शेतकरी तसेच नागरिकांची अफाट गर्दी होत असते. तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवट च्या वतीने सराफा लाईन भागात डेबिट व क्रेडिट एटीएम बसवण्यात यावे अशी मागणी सतीश राऊत व या भागातील व्यापारी व नागरिकांतून मागणी होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply