kinwat today news

दबलेल्यांना प्रेरणा देणारे महान नायक ‘ बिरसा मुंडा ‘ -गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : आदिवासींच्या आत्मसन्मानाची क्रांतीकारी चळवळ उभी करून मानवमुक्तीचा लढा उभारणारे महान नायक ” शहीद बिरसा मुंडा ” हे दबलेल्यांना प्रेरणा देणारे होते. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले.

येयील गट साधन केंद्रात मंगळवारी ( दि.९ जून ) शहीद बिरसामुंडा यांच्या स्मृतीदिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी आदरांजली वाहतांना ते बोलत होते. पुढे ते असे म्हणाले की, अन्यायाविरूध्द छेडलेल्या ” उलगुलान ” चं नेतृत्व करणारे बिरसा मुंडा हे युवकांचे क्रांतीस्रोत आहेत.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, सुदर्शन मेश्राम, ना.ना. पांचाळ, केंद्रीय मुख्याध्यापक राम बुसमवार, उत्तम कानिंदे, कनिष्ठ सहाय्यक गिरीधर नैताम, पत्रकार भोजराज देशमुख, प्रकाश कार्लेवाड, प्रभारी केंद्र प्रमुख एस. सी. कांबळे, वडवळे, डांगर, विषय तज्ज्ञ बाबुराव इब्बितदार, समशेर खान, योगेश वैद्य, दत्तात्रय मुंडे, उषा राठोड, त्रिगुणा कागणे, बाळू कवडे, निवेदक कानिंदे आदींनी धरती का आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply