kinwat today news

आज सायंकाळी 6.30 वाजता जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड या फेसबुक पेज लाईव्हवर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने live येत आहेत

नांदेड: लॉकडाऊन मर्यादा काही प्रमाणात शिथिल केल्याने नागरिक आपल्या व्यवहाराशी जुळवून घेऊ पाहत आहेत. रस्त्यांवर काहीप्रमाणात वर्दळ वाढत आहे. या वातावरणात कोरोना-कोविड 19 आजाराबाबत अनेक समज गैरसमज समाजात सोशल मिडियावर दिसत आहेत. यामुळे स्वाभाविकच आजच्या परिस्थितीत याची नेमकी काळजी घ्यायची कशी? याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अधिक आवश्यक आहे. जिल्ह्यातील सुजाण नागरिक, सेवाभावी संस्था यासाठी शासनासोबत प्रयत्नरत आहेत. कोरोना संदर्भात शासनातर्फे नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या उपाययोजना घेतल्या जात आहेत, याबाबत व कोरोना आजाराबाबत लोकांच्या शंकांचे समाधान व्हावे यासाठी आज सायंकाळी 6.30 वाजता फेसबुक लाईव्हवर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने संवाद साधणार आहेत

*आज ९ जून रोजी सायं. 6.30*

*https://www.facebook.com/dionanded/*

*आपल्या सूचना, प्रश्न असतील ते*

*मोकळेपणाने कमेंटबॉक्स मध्ये* *विचारा*

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply