kinwat today news

माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांची खासदार हेमंत पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट

किनवट: सिक्कीमचे माजी राज्यपाल ,माजी सनदी अधिकारी व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी उभयतांमध्ये राज्यातील ज्वलंत विषयावर चर्चा झाली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते , माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी खासदार हेमंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी श्रीनिवास पाटील यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आदरातिथ्य करत स्वागत केले . यानंतर दोन्ही उभयंता मध्ये कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील महत्वाच्या ज्वलंत विषयावर चर्चा झाली ,यामध्ये वाढविण्यात येणारे लॉकडाऊन , मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अधिपत्याखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि अत्यंत संयमाने हाताळत असलेली कोरोनाची परिस्थिती.या विषयांचा समावेश होता यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या संसदेतील कामकाजाचे कौतुक केले आणि ते आपल्या मतदार संघासाठी , शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामाची प्रशंसा केली. खासदार हेमंत पाटील यांच्या एक वर्षाच्या कालावधीत मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत याबाबत हि खासदार श्रीनिवास पाटील यांनी आढावा घेतला . मतदार संघात आगामी काळात काही सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सुद्धा दोघांमध्ये चर्चा झाली यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या फळबागेतील काही फळे भेट दिले .

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply