kinwat today news

कोरोना लॉकडाऊनमध्ये रोजगार बाधित झालेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शासकीय मदत देण्याबाबतआनंद गंगाधर तुपदाळे पाटील शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी दिले तासिलदारांना निवेदन

माहूर: कोरोना लॉकडाऊनमध्ये रोजगार बाधित झालेल्या महिलांना उदरनिर्वाहासाठी
शासकीय मदत देण्याबाबतआनंद गंगाधर तुपदाळे पाटील शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी.मा.तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सिद्धेश्वर वरणगावकर तहसील कार्यालय माहूर जि.नांदेड यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर केले आहे.


माहूर हे तीर्थक्षेत्राचे शहर असल्याने या शहरामध्ये विविध मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी उपलब्ध असलेल्या विविध धर्मशाळा, यात्रीनिवास व काही खाजगी पेइंग गेस्ट योजना चालवीनाऱ्या ठिकाणी कामे करणाऱ्या शहरातील काही महिला माहे २२ मार्च पासून कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक बंद असल्याने व मंदिरे बंद असल्याने रोजगार बाधित झाल्या असून सदर महिला ह्या हातावर पोट असणाऱ्या अत्यंत गरीब महिला आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांचे रोजगार हातून गेल्याने त्यांचे उदरनिर्वाह सह इतर अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी त्यांचेकडे काहीही शिल्लक नाही व आर्थिक उत्पन्न मिळणारे दुसरे कुठलेही साधन त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. करिता शासकीय निधीतून सदर महिलांना प्रपंच चालविण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.
तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की, समाजाच्या अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या या घटकाबाबत सहानुभूती दर्शवून त्यांना शासकीय निधीतून मदत देण्याची मसगणी निवेदनात केली आहे.या निवेदना सोबत रोजगार बाधित महिलांची यादी जोडली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी-
१.मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड
२.मा.मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत कार्यालय माहूर यांच्या कडे माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.असे तुपदळे यांनी सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply