kinwat today news

भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव (ग्रामीण) पदी काशिनाथ नारायणराव शिंदे यांची नियुक्ती


ईस्लापुर‌ (वार्ताहार) भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव (ग्रामीण) पदी काशिनाथ नारायणराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री डी.बी. पाटील, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगांवकर, आ. भीमराव केराम यांच्या हस्ते 3 रोजी देण्यात आले.


काशिनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या तीस वर्षापासून एक निष्ठेने काम करीत आहेत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डी.बी. पाटील यांचे अतिशय विश्वासू समर्थक मानले जातात. त्यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन शिंदे यांची भाजपा जिल्हा सचिव पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहेत. निवडीनंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे म्हणाले की, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री डी‌‌.बी. पाटील, आमदार भीमराव केराम, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम अधिक वेगाने करीत राहणार असून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व भाजपाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत राहणार आहे.

पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. अशी प्रतिक्रिया काशिनाथ शिंदे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल तिरमनवार, माजी तालुका अध्यक्ष गोविंद अंकुरवाढ, पंचायत समिती सभापती कपिल करेवाड, माजी पंचायत समिती सदस्य मारोती माहुरकर, प्रकाश दंडे, परमेश्वर पेशवे, संतोष मरस्कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

2 thoughts on “भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव (ग्रामीण) पदी काशिनाथ नारायणराव शिंदे यांची नियुक्ती

Leave a Reply