kinwat today news

दिनांक 7 जून 2020 रोजी पंजाब भवन यात्रीनिवास नांदेड येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नांदेड: आज दिनांक 7 जून 2020 रोजी पंजाब भवन यात्रीनिवास नांदेड येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

आज दिनांक 7 जून 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता पर्यंतच्या अहवालानुसार दिनांक 7 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 32 अहवाला पैकी 27 नेगेटिव अहवाल प्राप्त झाले .नवीन एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 190 एवढी झाली आहे. आतापर्यंत 190 रुग्णांपैकी 131 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित एकूण 51 रुग्णावर औषध उपचार चालू असून त्यातील 3 रुग्ण यापैकी एक स्त्री रूग्ण ज्याचे वय 65 आणि दोन पुरुष ज्यांचे वय 65 व 74 आहे त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. दिनांक 7 जून 2020 रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णाचा संक्षिप्त माहिती अशी सर्वेक्षण 142956 .घेतलेले स्वाब 4453. निगेटिव्ह स्वब 3942 .आज पॉझिटिव्ह रुग्ण 0 . एकूण पॉझिटिव्ह संख्या 190 .स्वब तपासणी अनिर्णित संख्या 174. स्वब नाकारण्यात आलेली संख्या81.मृत्यू संख्या8 . रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली संख्या 131 रुग्णालयात उपचार घेत असलेली रुग्ण 51 स्वब तपासणी रुग्ण संख्या 59.आहे
दिनांक सात जून रोजी एकूण 59 तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.
एकूण 190 पैकी 8 रुग्णां चा मृत्यू झालेला आहे व 131 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरित 51 पैकी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 रुग्ण एम आर आय यात्री निवास कोविड सेंटर येथे एकूण 38 उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण . तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे एक उपचारासाठी दाखल असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू “ॲप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवताली कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास आपणास सदरीलअँप सतर्क करण्यास मदत करते असे डॉक्टर नीळकंठ ईश्वरराव भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “दिनांक 7 जून 2020 रोजी पंजाब भवन यात्रीनिवास नांदेड येथील दोन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

Leave a Reply