kinwat today news

सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी – खासदार हेमंत पाटील

किनवट : गेल्या तीन महिन्या पासून राज्यातील सलून व्यवसाय बंद असून यामुळे राज्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे . त्यामुळे सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे .

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन सुरु असून नुकताच राज्यात आणि देशात ५ लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . यामुळे मागील तीन महिन्या पासून राज्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत .पाचव्या लॉक डाऊन नंतर काही प्रमाणात अत्यावश्यक सेवांना सवलत दिली आहे पण सलून व्यवसाय मात्र अद्यापही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे राज्यातील सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे सलून व्यवसाय करणारा नाभिक समाजाचे सर्व दैनंदिनी याच व्यवसायावर अवलंबून आहे . त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या समाजाला राज्य शासनाने २२ मी रोजी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली होती त्याप्रमाणे व्यवसायिकांनी सॅनिटायझर, स्वतंत्र पेपर नॅपकिन, स्वतंत्र कटिंग ऍप्रॉन , प्रत्येकास मागणीप्रमाणे सलून किट, सोशल डिस्टन्स, तसेच ग्राहकावर येणारे बंधन यावर २० ते २५ हजार रुपये खर्च करून दुकान चालू केले होते . पण सरकारने ३० जून पर्यंत सलून व्यवसाय बंद ठेवण्यात यावेत असे आदेश काढण्यात आले असल्याने सलून व्यवसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्यातील सलून व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी दयावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी निवेदनात केली आहे . सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने खासदार हेमंत पाटील सदैव निर्णय घेत असतात .

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी – खासदार हेमंत पाटील

 1. You are so cool! I do not suppose I have read through a single thing like
  this before. So great to find someone with
  a few original thoughts on this issue. Seriously..
  thanks for starting this up. This site is something that is needed on the internet,
  someone with a bit of originality!

Leave a Reply