kinwat today news

मौजे आपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील मातंग समाजातील क्षीरसागर परिवारावर दुसऱ्यांदा अन्याय

किनवट टुडे न्युज: मौजे आपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील मातंग समाजातील क्षीरसागर परिवारावर दुसऱ्यांदा अन्याय झाल्याची घटना समोर आली आहे.          सूत्रांच्या माहितीनुसार सविस्तर असे की, श्री दत्ता क्षीरसागर व व त्यांचे कुटुंबावर अन्याय झालेला असतानासुद्धा क्षीरसागर परिवारालाच खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रताप तुळजापूर येथील पोलीस स्टेशन कडून केला जात असून त्यामुळे मातंग समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून त्याचे पडसाद आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटताना दिसत आहे.
सदर प्रकरणातील पीडित श्री दत्ता हनुमंत क्षीरसागर यांनी श्री राजाभाई सूर्यवंशी समन्वयक मातंग समाज अन्याय निवारण समिती, महाराष्ट्र राज्य यांना लेखी अर्ज लिहून कळविले आहे की श्री हनुमंत लक्ष्मण क्षीरसागर यांना त्याच गावातील श्री परमेश्वर सिताराम राठोड व श्री ज्ञानेश्वर सिताराम राठोड या दोघांनी मिळून दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी कुऱ्हाडीने पायावर वार केले होते व जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती परंतु तुळजापूर पोलिस स्टेशनचे पी.आय. गवळी यांनी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल न करता फक्त आयपीसी 324, 506 दाखल करून आरोपींना पाठीशी घालण्याची करामत केली होती.

आता पुन्हा दुसऱ्यांदा त्याच दोघांनी म्हणजे परमेश्वर राठोड व ज्ञानेश्वर राठोड यांनी श्री दत्ता हनुमंत क्षीरसागर यांना जातिवाचक शिवीगाळ करून भररस्त्यात मारहाण केली आहे तसेच क्षीरसागर यांची आई संगीता हनुमंत क्षीरसागर यांना मारहाण केली तसेच त्यांचे ब्लाऊज फाडून विनयभंग केला. सदर बाबीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गेले असता येथील पी.आय. गवळी यांनी व येथील शिपाई झांजुर्डे यांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली म्हणून मातंग समाज अन्याय निवारण समितीने यात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती श्री दत्ता क्षीरसागर यांनी केली तेव्हा समितीचे समन्वयक श्री राजाभाऊ सूर्यवंशी यांनी पी.आय. गवळी यांची कानउघाडणी करून एफ.आय.आर नोंदवून घेण्यास भाग पाडले परंतु गवळी यांची भाषा व वर्तन कर्तव्यास साजेसे नसल्याने पी.आय. गवळी यांची तक्रार पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे व सदर प्रकरणाचा सतत पाठपुरावा श्री राजाभाई सूर्यवंशी व श्री विलास साबळे हे घेत आहेत तर सौ .जोशिला ताई लोमटे, डॉ. अंकुश गोतावळे व श्री टी. एस.क्षीरसागर हे पीडित कुटुंबाच्या संपर्कात राहून धीर देण्याचे व प्रकरणांमध्ये घाबरून माघार न घेण्याचे समजून सांगत आहेत. तसेच सदर प्रकरणाची तक्रार आय. जी. पुणे तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्याकडे मातंग समाज अन्याय निवारण समिती च्या वतीने करण्याचा निर्णय समिती च्या सर्व समन्वयकांनी घेतला असून यामध्ये सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री राजाभाई सूर्यवंशी व श्री विलास साबळे यांनी समितीच्या वतीने केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply