kinwat today news

कै.डी.टी कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या औषधांचे वाटप

किनवट :(प्रतिनीधी)
कै.डी.टी कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक वारसा जपत कोरोना वैश्विक महामारीत रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या औषधांचे वाटप किनवट पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 6 जून रोजी आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली व पो. नि. मारोती थोरात यांच्या उपस्थितीत बाळकृष्ण कदम यांनी केले.


कै. कदम गुरुजी यांनी नेहमी सामाजिक कामात रस दाखविलेला होता. वनातील वन्यप्राण्यांना पाण्याची सोय करणे, नागरिकासाठी बोर मारणे, झाडे लावणे असेल त्यांच्या याच सामाजिक कार्याचा धागा पकडत कोरोना महामारीत कामाच्या तणावामुळे आपल्या आरोग्याची काळजी न घेऊ शकणाऱ्या पोलिसांसाठी आर्सेनिक बम-30 या रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधी गोळ्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण कदम यांनी आपल्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केले आहे. यावेळी आ. केराम पुढे म्हणाले की, माझ्या भागातील पोलीस स्टेशन व निवासस्थान अद्यावत करण्यासाठी मी आजच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना पत्र लिहले असुन नवीन पोलीस स्टेशन व निवास स्थानांचे काम लवकर मार्गी लागणार आहे . या कार्यक्रम प्रसंगी वेळी किनवट पोलीस स्टेशन चे पो. नि मारोती थोरात, पो. उ. नि. राहूल भोळ, कांबळे सर, तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे, मारोती भरकड, डॉ. रितेश सुर्यवंशी, शिवाजीराव माने, संतोष मरसकोल्हे, राजेंद्र भातनासे, श्याम मगर, चव्हाण, सरपंच बालाजी पावडे तर पो.कॉ.कोलबुद्धे, पांढरे, गाडेकर, संदूपटलवार, बोंडलवाड, पाटोदो आदी कर्मचारी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply