kinwat today news

ईस्लापूर -शिवणी सर्कलमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतला पुढाकार

किनवट: तालुक्यातील ईस्लापूर, शिवणी, अप्पारावपेठ व जलधारा सर्कलमध्ये इंटरनेट सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील भारतीय दूरसंचार निगम लि. ( BSNL ) चे व्यवस्थापक यांना पत्र देऊन पुढाकार घेतल्याने या परिसरात नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शिवणी सर्कलचे शिवसेना कार्यकर्ते गजानन बच्चेवार यांनी नांदेड येथे खासदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन या परिसरात बीएसएनएलची इंटरनेट सुरू नसल्याचे निवेदन दिले होते. त्याची तात्काळ दखल घेऊन खासदार पाटील यांनी बीएसएनएलच्या व्यवस्थापकांना त्वरीत पत्र देऊन माझ्या हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट तालुक्यातील शिवणी , ईस्लापूर , अप्पारावपेठ व जलधारा या सर्कलमधील सर्व गावांमध्ये भारतीय दूरसंचार निगमची सेवा व नेटवर्क , इंटरनेटची असुविधा होत आहे. या सर्कलमध्ये भारतीय डाकसेवा , बँका , शासकीय कार्यालये , तलाठी कार्यालय , ग्रामपंचायत व इतर कार्यालयात इंटरनेट नसल्यामुळे येथील नागरीकांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे या गावांमध्ये ४ जी सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी सहकार्य करावे असे कळविले होते. खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतल्याने व्यवस्थापकांनी नेटवर्क सेवा सुरळीत सुरू ठेवण्याचे आश्वस्त केल्यामुळे या परिसरातील नेटवर्कचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply