kinwat today news

ना. अशोकराव चव्हाण कोरोना मुक्त झाल्याने मांडवी येथे पेढे वाटून आनंद साजरा

किनवट – (ता. प्र.) जिल्हयाचे पालकमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे मांडवी येथील समर्थक महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे सरचिटणीस नविनभाऊ राठोड व कार्यकत्यानी गावात पेढे वाटुन आनंद व्यक्त केले. राठोड यांनी पुढे बोलतांना आमचे साहेब सर्वाशी आपले पणाने वागायचे मग ते आपल्या पक्षाचा असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, आमच्या जिल्हयाला साहेबांसारखे नेतुत्व कोणी हिरावुन घेवू शकत नाही. मग ते कोरोना का असेना, जिल्हयातीलच नाहीतर संपुर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अर्शिवाद साहेबांच्या पाठीशी आहे. अशा आपल्या भावना राठोड यांनी व्यक्त केल्या.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची लागन झाल्यानंतर 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्या नंतर अशोकराव चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले असून तिथे 24 दिवस क्वारंटाईल राहणार आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply