महावितरण कंपनी विभागा अंतर्गत तालुक्यात विद्युत दुरुस्ती प्रगती पथावर

किनवट – (तालुका प्रतिनिधी)काही दिवसापूर्वी माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार यांनी किनवट वीज वितरण कंपनीत लेखी निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने करायची कामे तातडीने करण्यात यावी याबद्दल लेखी निवेदन दिले होते .तसेच या निवेदनाचा पाठपुरावा किनवट टुडे न्यूज ने बातमीच्या माध्यमातून केलेला होता याची दखल घेत वीज वितरण कंपनीने तातडीने पावसाळ्या पूर्वीची करायची कारणे सुरू केले आहेत.

सध्या पावसाळयाचे दिवस चालु असून ब-याच दिवसापासून तालुक्यातील विद्युत लाईन दुरुस्ती चे कामे रेंगाळत पडून होते. पण त्याची उपकार्यकारी अभियंता राहुल परचाके यांनी दखल घेऊन विद्युत कंत्राटदार शिव इलेक्ट्रिकल्स चे महेश बिराजदार यांच्याकडून दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे विद्युत सेवा सुरळीत मिळणार अशा आशा तालुक्यातील नागरिकांना वाटत आहेत.
बऱ्याच दिवसापासून गंज खाल्लेले वाकडे खांब, लूज तार, हवेमुळे स्पर्श होणारे तार, स्पेयर बसवणे, पोल बदलविणे, इंसुलेटर बदलविणे, कंडक्टर बदलवणे, झाडांची फांद्या तोडणे अशा अनेक अडचणी तालुक्यात निर्माण झाल्या होत्या त्यामुळे विद्युत सेवेला अडचण निर्माण झाली होती. आणी हवा पाऊस वादळ आलं की बिघाड निर्माण होऊन विद्युत सेवा असमर्थ ठरत होती. त्यामुळे व्यत्यय येत होता त्याची दखल कर्तव्यदक्ष किनवट महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता परचाके यांनी घेतली आणि किनवटचे विद्युत ठेकेदार, दर्जेदार कामासाठी नावलौकिक मिळविलेले, शिव इलेक्ट्रिकल्स चे महेश बिराजदार यांना सदर दुरुस्तीचे काम देण्यात आल्यामुळे कामाचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण होण्याची खात्री नागरिकांना झाली असून महावितरणाचे सहाय्यक शहर अभियंता सचिन ऊईके हे सदर कामावर लक्ष ठेवून आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.