kinwat today news

सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोरोना विषाणुची बाधा झालेल्या आज 16 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली असून या रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळीच आषोधोपचार त्यांनी सुरु केल्यामुळे या रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात करता आली.

जिल्ह्यात सोमवारी 1 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 116 अहवालापैकी 108 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 149 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 25 व 35 वर्षांचे दोन पुरुष रुग्ण हे देगलूर नाका येथील तर 40 वर्षे वयाचा एक रुग्ण शिवाजीनगर नांदेड येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 21 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. या 21 रुग्णांपैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.

आतापर्यंत एकूण 149 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 21 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 9 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील कोविड केअर सेंटर येथे 1 रुग्ण असून एक रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आला आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 307, घेतलेले स्वॅब 3 हजार 995, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 486, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 149, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 152, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 120, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 21, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 176 एवढी आहे.

दिनांक 31 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 187 स्वॅब तपासणी अहवालापैकी 116 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 71 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 1 जून रोजी 105 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

2 thoughts on “सोळा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

 1. Hmm it looks like your blog ate my first comment (it was extremely long) so I guess
  I’ll just sum it up what I submitted and say, I’m thoroughly enjoying your blog.
  I as well am an aspiring blog writer but I’m still new to the whole thing.
  Do you have any helpful hints for inexperienced blog writers?
  I’d really appreciate it.

Leave a Reply