kinwat today news

जिल्हाधिकारी  डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने फेसबुक लाईव्हवर

नांदेड (जिमाका) दि. 1 :- कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात आपले शासन आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिली आहे. आपली ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे. शेतकरी, कष्टकरी व कामगारांना, समाजातील सर्वच घटकांना सावरण्याची आहे.

अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी आपल्याशी फेसबुक लाईव्हद्वारे आपले जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उद्या सायं. 6 वा. ह्रदयस्पर्शी संवाद साधणार आहेत. त्यांचा हा संवाद https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/  या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येईल.
*संवाद दिनांक 2 जून 2020*
*वेळ सायंकाळी 6 वा*
*लाईव्ह पहा https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/ या लिंकवर*
*******

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “जिल्हाधिकारी  डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने फेसबुक लाईव्हवर

 1. Good day very cool blog!! Man .. Excellent .. Superb ..
  I’ll bookmark your website and take the feeds also? I am satisfied to search out so many helpful
  information right here in the post, we’d like work out more strategies on this regard, thanks for
  sharing. . . . . .

Leave a Reply