kinwat today news

दुःखद घटना : शनिवारपेठ येथील तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत ; परिसरात हळहळ व्यक्त.

किनवट:  किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या शनिवारपेठ येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना 1जून रोजी दुपारी 1 वाजता च्या सुमारास घडली.

प्राथमिक माहिती नुसार तालुक्यातील शनिवार पेठ गावालगत असलेल्या साठवण तलावावर 4 लहान मुले पोहोण्यासाठी गेले असताना नागनाथ प्रदीप राठोड वय 9 वर्ष व धम्मपाल रंनजीत सोनकांबळे वय 11 वर्ष हे दोघेजण राहणार शनिवारपेठ तालुका किनवट येथील आहेत. यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली पण पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत अन्य दोन मुले होती. त्यांनी सदरील घटना पाहून घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत त्या दोन चिमुकल्या बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता .सरपंच शिवराम दत्ता माहुरे यांनी किनवट पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदना साठी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी पाण्यात बुडुन मृत्यू झाल्यामुळे शनिवारपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तहसील प्रशासना तर्फे तलाठी के.आर.कदम,डी.बी.जोशी घटनास्थळी पोहचले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी समन्वय साधला.

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “दुःखद घटना : शनिवारपेठ येथील तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत ; परिसरात हळहळ व्यक्त.

 1. Hi there! This post could not be written much better!

  Looking through this post reminds me of my previous roommate!
  He constantly kept preaching about this. I’ll send this information to him.

  Fairly certain he’s going to have a great read. Thanks for sharing!

 2. Its such as you read my thoughts! You appear to know a lot about this, like
  you wrote the book in it or something. I feel that you could do with some percent
  to pressure the message house a bit, however other
  than that, that is wonderful blog. A fantastic read.
  I will definitely be back. adreamoftrains web hosting services

 3. Greetings, I do believe your website may be having internet browser compatibility issues.
  Whenever I look at your website in Safari, it looks fine however when opening in Internet Explorer,
  it’s got some overlapping issues. I simply wanted to give you
  a quick heads up! Aside from that, great blog!

Leave a Reply