kinwat today news

कनकवाडीत घरगुती सुती कपड्यांपासून पॅड तयार करून मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समावेशित गाव ग्रामपंचायत कनकवाडी ता.किनवट येथे घरगुती सुती कपड्यांपासून पॅड तयार करून मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा करण्यात आला

मासिक पाळी व्यवस्थापन दिनाचे औचित्य साधून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे पाठविण्यात आलेल्या एका मार्गदर्शक व्हिडिओच्या सहाय्याने गावातील महिलांनी घरबसल्या घरगुती सुती कपड्याचा पॅड कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन घेवून कृतीयुक्त पद्धतीने पॅड शिवून हा महत्वपूर्ण दिवस साजरा केला. प्रामुख्याने सुती कपडा घरी सहज मिळतो, सुती कपड्यांमुळे त्वचेला त्रास होत नाही अन सुती कपड्यात शोषणाची क्षमता अधिक असते यामुळे हे पॅड अगदी नाममात्र खर्चात तयार करता येत असल्याने महिलांनी आता यापुढे अशा पद्धतीने घरच्या घरी पॅड तयार करून वापरता येईल असा मनोदय व्यक्त केला. हा पॅड सुती कपडा, सुई, धागा, चिटबटन, पेन, टेप आणी कात्री इत्यादींचा वापर करून घरच्या घरी बनवता येतो. या महत्वपूर्ण उपक्रमात उमेद अभियानाच्या ग्रामप्रेरिका सिआरपीताई रंजना गवले, निशा दशरथ व्यवहारे, अंजली बळिराम गवले, अलका गोविंद गवले, सुनीता उत्तम मुरमुरे आदी महिलांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा नोडल अधिकारी तथा सहाय्यक नियोजन अधिकारी जी.बी. सुपेकर व जिल्हा व्यवस्थापक योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सदर उपक्रम अंमलबजावणीत गावच्या सरपंच जयश्री पंडित व्यवहारे, उपसरपंच सुमनबाई जयवंतराव जाधव, ग्रामसेवक अतुल लष्करे, ग्रामपरिवर्तक पांडुरंग मामीडवार, उमेद अभियान व्यवस्थापक गौतम वाव्हूळे, आरोग्य सहाय्यक एन.एल.अनेलवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्षा अशोक वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “कनकवाडीत घरगुती सुती कपड्यांपासून पॅड तयार करून मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा

Leave a Reply