kinwat today news

किनवट: सेटट्राइब आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून ‘किनवट कार्ट’ ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या सॉफ्टवेअरची निर्मीती

किनवट दि. (तालुका प्रतिनिधी):
किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या वतिने व्यापारी व ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डरची सुविधा उपलब्ध होने ही आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिवार्य अशी सुविधा आहे तसेच ह्या सॉफ्ट्वेअरचा उपयोग नागरिकांनी केल्यास ही किनवटच्या उज्वल भविष्याची ही नांदी असेल आणि सेटट्राइब आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून ह्या सॉफ्टवेअरची निर्मीती झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल माहिती तंत्रज्ञानाकडे वळेल असे प्रतिपादन आमदार भिमराव केराम ह्यांनी केले. ते किनवट नगर परिषदेच्या वतिने तयार करण्यात आलेल्या ‘किनवट कार्ट’ ह्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ह्यावेळी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, उपविभागिय अधिकारी अभिनव गोयल, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, व्यापारी संघटनेचे दिनकर चाडावार उपस्थित होते.
किनवट नगर परिषदेच्या वतीने किनवटचे व्यापारी व ग्राहकांच्या सुविधेसाठी ‘किनवट कार्ट’ ह्या अ‍ॅंड्रॉइड आप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली. ह्या आप्लिकेशचे लोकार्पण आज आमदार भिमराव केराम व उपविभागिय अधिकारी अभिनव गोयल ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्याप्रसंगी पुढे बोलताना आमदार केराम म्हणाले की कोरोनामुळे आता नागरिक घरातून बाहेर निघताना काळजी घेणे गरजेची आहे. अश्या परिस्थितीत किनवट कार्ट सारख्या सॉफ्टवेअर मुळे लोकांना घरबसल्या किराणा ऑर्डर करता येण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. ह्या सॉफ्टवेअर चा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करावा व व्यवहार करताना कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे असे आवाहनही त्यानी केले. खासदार हेमंत पाटील ह्यांनी ह्याप्रसंगी उपस्थिती दर्शवली व अ‍ॅपची सविस्तर माहिती घेउन शुभेच्छा दिल्या. किराणा सुविधा देतांनाच शेतकर्‍यांसाठी ह्या अ‍ॅपमध्ये भाजीपाला व फळे घरपोच पुरवण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी अशी सुचनाही खासदार पाटील ह्यांनी ह्यावेळी केली.
किनवट कार्ट च्या लोकार्पण प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की सध्याच्या कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे ह्या विचारातुनच ह्या सॉफ्टवेअरची संकल्पना सुचली. आणी हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी पुणे मुंबई ह्यासारख्या शहरातील सॉफ्ट्वेअर तयार करणार्‍या कंपनीची निवड करण्यापेक्षा सेटट्राईब ह्या संस्थेची निवड केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल व भविष्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती साठी उपयोग होईल. ह्याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार म्हणाले की सदर सॉफ्ट्वेअर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी जनप्रतिनिधींची आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून नागरिकांना हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. उपस्थित पत्रकारांना सुद्धा सदर सॉफ्टवेअरला प्रसिद्धी देण्याचे आवाहन नगराध्यक्ष मच्छेवार ह्यांनी केले.
सेटट्राईबचे संचालक सारंग वाकोडीकर ह्यांनी सदर सॉफ्टवेअर बद्दल माहितीपर प्रेसेंटेशन दिले आणी सॉफ्टवेअरचा डेमो उपस्थितांना दाखवला. सेटट्राईबच्या सीएसआर च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे टॅलेंट जगभरात पोहोचवण्यासाठी व दर्जेदार सॉफ्टवेअर किनवटकरांना उपलब्ध करून देण्यासाठी किनवट नगर परिषदेला अत्यल्प किमतीत हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते म्हणाले. सदर लोकार्पण प्रसंगी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार ह्यांनी प्लेस्टोरवर हे सॉफ्ट्वेअर किनवट कार्ट ह्या नावाने उपलब्ध असून जास्तीत जास्त नागरीकांनी डाउनलोड करून ह्याचा उपयोग घ्यावा असे आवाहन केले.
ह्या लोकार्पण सोहळ्याला अनिल तिरमनवार, मारोती भरकड, बालाजी पावडे, किनवट भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, नप सभापती व्यंकट नेम्मानिवार, शहराध्यक्ष श्रिनिवास नेम्मानिवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिराणी, माजी नगराध्यक्ष साजीद खान, मधुकर आन्नेलवार, नगरसेवक बाबुराव ओद्दीवार, फेरोज तंवर, शिवा आंधळे, नरेश सिरमनवार, मनोज तिरमनवार, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

One thought on “किनवट: सेटट्राइब आयटी सोल्युशन्सच्या माध्यमातून ‘किनवट कार्ट’ ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या सॉफ्टवेअरची निर्मीती

Leave a Reply