kinwat today news

रविवारी दोन नवीन रुग्ण ; एक पुरुष रुग्ण बरा ; चौतीस रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु

नांदेड (जिमाका) दि. 31 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 31 मे 2020 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 30 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर 2 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 146 झाली आहे. रविवार 31 मे रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील एक पुरुष रुग्ण बरा झाला असून आतापर्यंत 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात उर्वरीत एकुण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील 2 नवीन पॉझीटीव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय 27 व 32 वर्ष आहे. त्यांच्यावर मुखेड उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. औषधोपचार चालू असलेल्या 4 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय 52 व 65 आणि दोन पुरुष ज्यांचे वय 38 व 80 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 39 हजार 674, घेतलेले स्वॅब 3 हजार 890, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 378, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 2, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 146, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 148, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 27, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 104, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 34, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 187 एवढी आहे.

शनिवार 30 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 152 स्वॅब तपासणी अहवालापैकी 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 122 अहवाल रविवार 31 मे रोजी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. रविवार 31 मे रोजी 65 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सोमवार 1 जून रोजी सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

एकूण 146 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 104 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 34 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण 14, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथील कोविड केअर सेंटर येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

000000

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

3 thoughts on “रविवारी दोन नवीन रुग्ण ; एक पुरुष रुग्ण बरा ; चौतीस रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु

 1. Howdy! I know this is kinda off topic nevertheless I’d figured I’d ask.
  Would you be interested in exchanging links or maybe guest authoring a blog article or
  vice-versa? My website addresses a lot of the same topics as
  yours and I think we could greatly benefit from each other.
  If you are interested feel free to shoot me an e-mail.
  I look forward to hearing from you! Fantastic blog by the way!

Leave a Reply